इंडियन प्रीमिअर लीग २०२५ नंतर कर्णधार श्रेयस अय्यरला टी-२० मुंबई लीगमध्येही जेतेपदाने हुलकावणी दिली. सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने गुरुवारी अंतिम सामन्यात बाजी मारली. मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्सला पाच विकेट्सने त्यांनी पराभूत केले.