Rohit Sharma and Tilak Varma share a light moment amid rain interruption in Guwahati
esakal
MI vs RR Guwahati Rohit Sharma reaction to weather viral clip : गुवाहाटी येथे मागील २० मिनिटे पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे खेळाडू स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण, खेळपट्टीवर अजूनही कव्हर्स टाकले गेले आहेत आणि ४०-५० मिनिटानंतर खेळपट्टीची पाहणी केली जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील सामना गुवाहाटीच्या Barsapara Cricket स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, पावसामुळे हा सामना विलंबाने सुरू होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.