पहिल्या ट्वेंटी-२०त बांगलादेशचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
बांगलादेशने १५.३ षटकांत ७ विकेट्स राखून मारली बाजी
पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हेसन यांचे खेळपट्टीकडे बोट
Mike Hesson blames Shere Bangla pitch : पाकिस्तान क्रिकेट संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला ११० धावांवर गुंडाळल्यानंतर बांगलादेशने १५.३ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात ही मॅच जिंकली. तीन विकेट्स घेणार तस्कीन अहमद व ५६ धावांची खेळी करणारा परवेझ होसैन एमोन हे या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभवानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी खेळपट्टीला दोष दिला आहे.