
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा नुकतीच संपली. ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी अखेरची वनडे स्पर्धा ठरेल, असं म्हटलं जात होतं. या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार स्टीव्ह स्मिथनेही वनडेतून निवृत्तीची घोषणा केली होती.
तसेच मुस्तफिजूरही वनडेतून निवृत्त झाला आता आणखी एका दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. हा खेळाडू आहे बांगलादेशचा ३९ वर्षीय अष्टपैलू महमुद्दुलाह. महमुद्दुलाह मुस्तफिजूरचा मेव्हणाही आहे.