

Bangladesh Cricket Team
Sakal
Bangladesh Players Threaten Boycott Over BCB Director's Controversial Remarks: बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे. बांगलादेशच्या खेळाडूंनीच आता देशांतर्गत सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) संचालक नजमुल इस्लाम यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमामात नाराजी दिसून येत आहे.
आधीच बांगलादेशच्या टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील (T20 World Cup 2026) सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. त्यात आता हा नवा गोंधळ समोर आला आहे. मात्र नजमुल यांच्या विधानापासून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वत:ला लांब ठेवले आहे.