Bangladesh asks ICC to change T20 World Cup group
esakal
Bangladesh refusal to play T20 World Cup matches in India: बांगलादेशचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात सामने न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतात संतापाची लाट आहे. त्यामुळेच कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२६ पूर्वी बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याची हकालपट्टी केली. त्यानंतर बांगलादेश सरकार व बांगलादेश क्रिकेट बोर्ड ( BCB) यांनी सुरक्षेचं कारण पुढे करून भारतातील वर्ल्ड कप सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. स्पर्धेच्या तोंडावर हे शक्य नसल्याचे समजावण्यासाठी ICCचे अधिकारी बांगलादेशात पोहोचले आणि तेथे त्यांच्यासमोर नवीन मागणी ठेवण्यात आली आहे.