मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

Mustafizur Rahman controversy : मुस्ताफिजूर रहमानच्या आयपीएलमधील हकालपट्टीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आक्रमक पवित्र्यात आला आहे. त्यांनी मुस्ताफिजूरच्या हकालपट्टीचा राग भारतीय निवेदिका रिधिमा पाठक हिच्यावर काढला आहे. त्यावर रिधिमानेही सडेतोड उत्तर दिले आहे.
Indian presenter Ridhima Pathak| Bangladesh Premier League | hosting panel | Mustafizur Rahman Controversy

Indian presenter Ridhima Pathak| Bangladesh Premier League | hosting panel | Mustafizur Rahman Controversy

esakal

Updated on

Why Ridhima Pathak removed from BPL hosting panel? बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या भावनांचा आदर करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) इंडियन प्रीमिअर लीगमधून बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजूर रहमान याच्या हकालपट्टीचे आदेश कोलकाता नाइट रायडर्सना दिले. KKR नेही त्वरित पाऊलं उचलताना रहमानला करारमुक्त केले, त्यानंतर बांगलादेश सरकार संतापले. त्यांनी बांगलादेशात आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली. भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न खेळण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सामने श्रीलंकेत हलवण्याचे मागणी केली. त्यात आता त्यांचा नवीन प्रताप समोर येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com