
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा पाकिस्तान आणि युएई येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी आता जवळपास एक महिन्याचाच कालावधी राहिला आहे. १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशात आता सहभागी देश आपापले संघ घोषित करत आहेत.
इंग्लंड, न्यूझीलंड या संघांनी त्यांचे संघ जाहीर केले असून आता बांगलादेश क्रिकेट संघानेही त्यांचा संघ जाहीर केला आहे. बांगलादेशने संघ घोषित करताना काही धक्कादायक निर्णयही घेतले आहेत.