Bangladesh’s T20 World Cup matches could be moved from Mumbai and Kolkata
esakal
Bangladesh T20 World Cup matches: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आता तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे आणि तरीही बांगलादेश आपला हट्ट सोडायला मागत नाहीए. इंडियन प्रीमिअर लीगमधून मुस्ताफिजूर रहमानची हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादे क्रिकेट बोर्ड ( BCB) आणि बांगलादेश सरकार खवळले. त्यांनी आयसीसीला पत्र लिहून भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. पहिल्या पत्राला ICC ने भीक घातली नाही आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा पत्र पाठवले. पण, आता आयसीसीने त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय देण्याची तयारी सुरू केली आहे.