बांगलादेशचा दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ८ धावांनी विजय
पाकिस्तानला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत हरवून जिंकली मालिका
फखर जमानने ट्वेंटी-२०त पाकिस्तानकडून सर्वाधिक ५३ झेलचा विक्रम नावावर केला
BAN vs PAK 2nd T20I highlights and full match summary: बांगलादेशने घरच्या मैदानावर सुरू असलेल्या ट्वेंटी-२० मालिकेत पाकिस्तानला नाक घासायला भाग पाडले आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशने थरारक विजयाची नोंद करताना ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी खेळपट्टीवर खापर फोडले होते, आता ते काय कारण देणार, याची उत्सुकता आहे.