
Bangladesh Creates History: पाकिस्तानात महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धा खेळवली जात आहे. लाहोर येथे झालेल्या आजच्या सामन्यात बांगलादेशने १७८ धावांनी थायलंडवर विजय मिळवला. बांगलादेशच्या ३ बाद २७१ धावांच्या प्रत्युत्तरात थायलंडचा संपूर्ण संघ २८.५ षटकांत ९३ धावांवर तंबूत परतला. पण, या सामन्यात एक असा पराक्रम घडला जो महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच घडला. यापूर्वी पुरुषांच्या वन डे क्रिकेट सामन्यात १९७७ मध्ये असा पराक्रम झाला होता.