

Team India | T20 World Cup 2026
Sakal
India's T20 World Cup 2026 Super-8 Schedule: मंगळवारी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यात पाल्लेकेले येथे होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे झिम्बाब्वेला मात्र फायदा झाला.
हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला. त्यामुळे झिम्बाब्वेचे ५ पाँइंट्स झाले आणि त्यांनी बी गटातून सुपर-८ फेरीत प्रवेश मिळवला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ मात्र स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा (Australia) या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यांनी आयर्लंडला हरवलं होतं, पण त्यांना झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.