BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

India T20 World Cup 2026 champions prize money: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघावर आता पैशांचा पाऊस पडणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघासाठी तब्बल १३१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
BCCI Rewards T20 World Cup Champions India With Massive ₹131 Crore Prize Money

BCCI Rewards T20 World Cup Champions India With Massive ₹131 Crore Prize Money

esakal

Updated on

How much prize money India received after T20 World Cup win: सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) १३१ कोटी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. सूर्यकुमार यादवच्या संघाने वर्ल्ड कप फायनलमध्ये रविवारी ८ मार्च रोजी न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद कायम राखणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. तर आता सर्वाधिक ३ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयने मंगळवारी रोख बक्षीसाची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com