

India A vs Nepal
esakal
BCCI Announces Historic India A Tour of Nepal: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेटला बळ देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. भारत 'अ' पुरुष संघ डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर जाणार असून, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
या निर्णयामुळे भारत आणि नेपाळमधील क्रिकेट संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.