

India Women Test Team
Sakal
India Women Test Squad for Australia Tour: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे, टी२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. २०२५ वनडे वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचा हा पहिला परदेशी दौरा आहे.
या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी यापूर्वीच संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात एक बदल झाला आहे. तसेच एकमेव कसोटी सामन्यासाठीही भारतीय महिला संघाची (India Women's Cricket Team) घोषणा शनिवारी (२४ जानेवारी) करण्यात आली आहे.