
बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा मुंबईत आज (१ फेब्रुवारी) झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी भारताचे अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.
भारत आणि इंग्लंड संघात रविवारी (२ फेब्रुवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी२० मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघही मुंबईत असल्याने या दोन्ही संघातील सदस्यही पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यात २०२३-२४ या मोसमात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.