
ICC Test Cricketer Of The Year 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०२४ पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येत असून मानाचा मानला जाणारा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार जिंकण्याचा मान भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मिळाला आहे तो आयसीसीचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकणारा सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.