Gautam Gambhirच्या निवडीबाबत विराट कोहली अनभिज्ञ, पण हार्दिक पांड्याला होती इत्यंभूत माहिती

बीसीसीआयने गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गौतम गंभीर 2027 पर्यंत टीम इंडियाचा प्रशिक्षक असणार आहे.
Virat Kohli Gautam Gambhir
Virat Kohli Gautam Gambhirsakal

बीसीसीआयने गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गौतम गंभीर 2027 पर्यंत टीम इंडियाचा प्रशिक्षक असणार आहे. टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा होताच सोशल मीडियावर गौतम गंभीरच्या अभिनंदनाची प्रक्रिया सुरू झाली.

आता एक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, गंभीरला प्रशिक्षक बनवण्यापूर्वी विराट कोहलीशी कोणतीही चर्चा झाली नाही. तर हार्दिक पांड्यासह काही खेळाडूंना याची आधीच माहिती होती.

Virat Kohli Gautam Gambhir
Rohit Sharma : गुरु द्रविडचा पठ्ठ्या रोहित करणार होता 5 कोटींचे बलिदान पण... वाटणीवेळी काय घडलं नेमकं?

कोहली आणि गंभीरमध्ये अनेक वाद झाले आहेत. आयपीएल दरम्यान हे दोन खेळाडू मैदानावर भिडले होते. हिंदुस्तान टाईम्समधील एका बातमीनुसार, बीसीसीआय कोहलीशी मुख्य प्रशिक्षकाबाबत काहीही बोलली नाही. गंभीरकडे जबाबदारी सोपवण्यापूर्वी त्याला माहितीही देण्यात आली नव्हती. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Virat Kohli Gautam Gambhir
India Support Staff: नवा ट्विस्ट! गंभीरने संपूर्ण भारतीय स्टाफचा हट्ट सोडला; परदेशी खेळाडूसाठी BCCIकडे लावला वशीला

एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबत गंभीरचा ताळमेळ कसा आहे हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. रोहित आणि द्रविड यांच्यात चांगले संबंध होते आणि अनेकांचा असा विश्वास आहे की यामुळेच गेल्या काही वर्षांत संघाची कामगिरी चांगली झाली आणि अखेरीस संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी झाला.

द्रविडने भविष्यातही संघाच्या प्रशिक्षकपदी राहावे अशी आपली इच्छा होती, हे सत्य लपवण्याचा प्रयत्नही रोहितने केला नाही. परंतु या माजी दिग्गज खेळाडूने ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि कोहली श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी होण्याचीही शक्यता आहे.

Virat Kohli Gautam Gambhir
Gautam Gambhir Salary : टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरचा पगार किती, राहुल द्रविडपेक्षा मिळणार कमी पैसे?

आता टीम इंडिया हार्दिक पांड्या टी-20 कर्णधार बनवू शकतो. पांड्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे आणि आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. अहवालानुसार, पांड्या अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना माहित होते की गौतम गंभीर पुढील मुख्य प्रशिक्षक होणार आहे. पण कोहलीला याची माहिती नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com