Vaibhav Sooryavanshi ला 'राड्या'नंतर बीसीसीआयने एकटे पाडले; सचिव देवजित सैकिया म्हणाले, आम्ही या प्रकरणात...

BCCI statement on Vaibhav Sooryavanshi altercation: भारत अ संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका अ संघातील खेळाडू यांच्यात डंबुल्ला येथे झालेल्या मैदानावरील वादानंतर BCCI ची भूमिका स्पष्ट झाली आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

BCCI Secretary Breaks Silence on Vaibhav Sooryavanshi Incident: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, श्रीलंका दौऱ्यावर त्याच्या कामगिरीपेक्षा मैदानावरील राड्यावरून जास्तच चर्चेत आला आहे. श्रीलंका अ संघाविरुद्धच्या लढतीत वैभवने धक्काबुक्की केल्याचा Video Viral झाला होता. वैभव आणि श्रीलंकेच्या 'अ' संघातील खेळाडू यांच्यात मैदानावर झालेल्या वादाच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही, असे सचिव देवजित सैकिया यांनी ठामपणे सांगितले. यासंदर्भातील कोणतीही कारवाई ही, आयसीसीच्या नियमांनुसार सामनाधिकारी आणि पंचांच्या अधिकारक्षेत्रात येते, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com