

BCCI
Sakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आता भारताचा माहिती अधिकार (RTI) कायदा लागू होणार नाही. बीसीसीआय आरटीआयच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्णय केंद्रिय माहिती आयोगाने (CIC) घेतला आहे. हा निकाल माहिती आयुक्त पी. आर. रमेश यांनी दिला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला आरटीआय २००५ कायद्या अंतर्गत सार्वजनिक संस्था मानण्यात येणार नाही. त्यामुळे बीसीसीआयला आता माहिती अधिकार कायद्यातील अनिवार्य प्रकटीकरणाच्या आवश्यकतेपासून संरक्षण मिळाले आहे.