अजित आगरकरच्या कार्यकाळात भारताने २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
मागील ९ महिन्यांत रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
सध्याच्या निवड समितीत आगरकर, एसएस दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरथ यांचा समावेश आहे.
BCCI extends Ajit Agarkar’s term as chief selector till 2026 : भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. केवळ संघात नव्हे, तर आता निवड समितीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर याचा करार जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. आयपीएल २०२५ पूर्वीच आगरकर याला करारवाढीचा प्रस्ताव दिला गेला होता आणि त्याचा त्याने स्वीकार केला आहे.