BCCI condoles the tragic loss of Afghan cricketers
Sakal
Cricket
BCCI अफगाणिस्तानसोबत! पाकिस्तानच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या तिन्ही क्रिकेटपटूंबद्दल व्यक्त केला शोक
BCCI Mourns the Loss of Afghan Cricketers: अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतावर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात तीन युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. याबाबत बीसीसीआयने शोक व्यक्त केला आहे. तसेच अफगाणिस्तानच्या दु:खात सामील असल्याचे म्हटले आहे.
Summary
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात ४० जणांचा मृत्यू झाला, ज्यात तीन उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा समावेश होता.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या हल्ल्याचा निषेध केला असून, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेतून माघार घेतली आहे.
बीसीसीआयनेही शोक व्यक्त केला आहे आणि अफगाणिस्तानच्या दु:खात सामील असल्याचे म्हटले आहे.

