BCCI Secretary Devajit Saikia speaks about the IPL 2026 schedule
esakal
Will RCB play MI or CSK in IPL 2026 opener: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असली तरी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या वेळापत्रकाकडेही लागले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) दिलेल्या अपडेट्सनुसार २८ मार्चपर्यंत आयपीएल २०२६ ला सुरुवात होईल आणि ३१ मे रोजी फायनल होईल. पण, आता २५ दिवस शिल्लक राहिले असूनही वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मागील पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपद पटकावले होते आणि प्रथमच ट्रॉफी उंचावली होती. आयपीएलच्या परंपरेनुसार पहिला सामना हा गतविजेता संघ खेळतो आणि यंदाच्या पर्वातही RCB चा पहिला सामना असेल हे पक्के आहे. पण, सलामीच्या सामन्यात RCB चा प्रतिस्पर्धी कोण असेल? याबाबत उत्सुकता आहे.