BCCI plans to add two new IPL franchises. Pune and Vadodara have emerged as potential destinations
esakal
Pune IPL team comeback latest news: इंडियन प्रीमिअर लीगच्या कक्षा आणखी रुंदावणार आहेत. आयपीएलमधील संघांची संख्या १० वरुन १२ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि त्यात पुणेकरांना त्यांच्या हक्काच्या संघाला चिअर करण्याची संधी मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षांची बंदी असताना पुण्याचा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. पण, त्यानंतर पुणेकरांना आयपीएलच्या हक्काच्या संघासाठी अद्याप वाट पाहावी लागली आहे. त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण नव्या दोन फ्रँचायझींमध्ये पुणे व वडोदरा ही दोन शहरं आघाडीवर असल्याचे वृत्त समोर येत आहे.