Will BCCI sack Gautam Gambhir after South Africa whitewash?
esakal
'टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर मला कायम ठेवायचे की नाही, याचा निर्णय BCCI घेईल,' असे विधान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर केले होते. भारताला गुवाहाटी कसोटीत आफ्रिकेने ४०८ धावांनी हरवले आणि हा भारताचा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. गौतमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मागील १२ महिन्यांत दोनवेळा घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारला. मागील वर्षी न्यूझीलंडने ३-० अशा फरकाने भारताला लोळवले होते आणि त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल हुकली होती. काल आफ्रिकेने दुसरी कसोटी जिंकून मालिका २-० अशी खिशात घातली आणि भारताचा WTC Final 2027 चा मार्ग खडतर बनवला.