

Smriti Mandhana
Sakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वार्षिक पुरस्कार २०२६ (Naman Awards 2026) घोषणा केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत १५ मार्च रोजी पार पडेल. पण त्याआधी पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं बीसीसीआयने जाहीर केली आहेत.
तीन दिग्गज खेळाडूंचा जीवनगौरव पुरस्काराने (Lifetime Achievement Award) सन्मान करण्यात येणार आहे, तर शुभमन गिल (Shubman Gill) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) सर्वोत्तम खेळाडू ठरलेत.