Gautam Gambhir: गौतम गंभीर, अजित आगरकर अन् शुभमन गिल BCCI च्या मुख्यालयात! भारतीय क्रिकेटमध्ये उलथापालथ होण्याचे संकेत

BCCIच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत गौतम गंभीर, अजित आगरकर आणि शुभमन गिल सहभागी होणार आहेत. आगामी न्यूझीलंड दौरा, वनडे विश्वकरंडकाचा रोडमॅप, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि खेळाडूंच्या फिटनेससह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक उद्या होत आहे. त्यामध्ये आगामी न्यूझीलंडचा तिन्ही प्रकारांतील महत्त्वाचा दौरा तसेच पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचाही सहभाग असणार आहे.

भविष्यातील दौरा आणि स्पर्धेबाबत चर्चा अपेक्षित असताना जून-जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये आलेले अपयश याचेही विश्लेषण केले जाणार आहे; परंतु भूतकाळापेक्षा भविष्याचा विचार करून सुधारणा करण्याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com