
भारतीय क्रिकेट संघासाठी गेले ८ महिने चढ-उतारांचे राहिले आहेत. भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही १० वर्षांनी भारताने कसोटी मालिका गमावली. पण यानंतर नुकतेच मार्चमध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली.
या सर्व गोष्टी गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली झाल्या आहेत. आता भारतीय संघाला आयपीएल २०२५ नंतर इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. पण त्याआधी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.