
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा म्हटले की पैसा हा चर्चेचा विषय ठरतोच. श्रीमंत स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा असून कोट्यवधी रुपये या स्पर्धेसाठी भागधारकांनी गुंतवलेले आहेत. अशात या स्पर्धेत भ्रष्टाचाराचा धोकाही तितकाच मोठा आहे.
यापूर्वीही काही वर्षांपूर्वी या स्पर्धेला फिक्सिंगचे गालबोट लागलेले आहे. असे असतानाच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)आयपीएलच्या सर्व भागधारकांना संभाव्य भ्रष्टाचाराच्या प्रयत्नांबद्दल आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे.