कसोटी क्रिकेटला सीरियसली घ्या ! Jasprit Bumrah ला मिळालीय सूचना, गौतम गंभीर संतापलाय; BCCI म्हणतेय...

BCCI Cracks Down on India’s Poor WTC Form: भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी कामगिरीवरून आता BCCI गंभीर झाले आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत सहाव्या स्थानावर घसरला असून, संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने खेळाडूंना कसोटी क्रिकेट अधिक गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
BCCI urges Team India to focus on Test cricket

BCCI urges Team India to focus on Test cricket

esakal

Updated on

Why BCCI wants Jasprit Bumrah to play full WTC cycle? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय खेळाडूंना कसोटी क्रिकेटला गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यांनी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने खेळण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघाला WTC मध्ये संघर्ष करावा लागतोय आणि ते तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. BCCI ने कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी बुमराहने काही वन डे मालिका चुकवल्या तरी त्यांना हरकत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com