गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियात बदलाचे वारे वाहत असून शुभमन गिलला सर्व फॉरमॅट कर्णधार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
रोहित शर्मा (३८) आणि विराट कोहली (३६) यांच्यावर २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळता येईल का, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोघांनी टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते अजूनही वन डे खेळत आहेत.
What is BCCI’s policy on Virat Kohli and Rohit Sharma retirement : गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियात बदलाचे जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. शुभमन गिल हा ऑल फॉरमॅट कर्णधार होण्याच्या मार्गावर आहे आणि गंभीरला त्याचा फुल सपोर्ट आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवल्यानंतर गिलला ट्वेंटी-२० व वन डे संघाचे नेतृत्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच रोहित शर्मा व विराट कोहली या दोन दिग्गजांच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. आता BCCI नेही त्यावर उघड भाष्य केले आहे.