India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष आणखी पेटला आहे. पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत आणि त्याला भारतीय लष्कर तोडीसतोड उत्तर देतोय. सैरभैर झालेल्या पाकिस्तानला आता स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली की काय असे वाटू लागले आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचीही ( PCB) नाचक्की झाली आहे. पाकिस्तानला त्यांची पाकिस्तान सुपर लीग ( PSL) गुंडाळावी लागली आहे. पीसीबीने पीएसएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याची घोषणा केली होती, परंतु UAE ने नकार दिल्यानंतर PCB ला ही लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली.