गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

Elephant And India’s Historic Oval Triumph: २४ ऑगस्ट १९७१ हा भारतीय क्रिकेटसाठीचा ऐतिहासिक दिवस आहे. गणेश चतुर्थीच्या या दिवशी भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी सज्ज होता आणि त्याचवेळी अचानक मैदानात हत्तीण आली होती. हा खास किस्सा जाणून घ्या
England vs India

Bella The Elephant And India’s Historic Oval Triumph

Sakal

Updated on

Elephant Behind India’s 1971 Oval Win: २४ ऑगस्ट १९७१ रोजी जेव्हा दक्षिण लंडनमध्ये असेलेल्या ओव्हल मैदानावर बेला (Bella) नावाची हत्तीण सजवून आणली होती, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मुखातून नकळतच 'गणपती बाप्पा मोरया', असेच हेच शब्द बाहेर पडले असावेत. त्यावेळी ओव्हलच्या मैदानात फक्त क्रिकेचा सामना खेळला गेला नव्हता, तर एक दैवी आणि अलौकिक नाट्य घडलं होतं.

भारताने १९७१ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. त्याआधी भारताला इंग्लंडमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता. १९ पैकी १५ सामने गमावले होते, तर ४ सामने अनिर्णित राहिले होते. पण १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाकडून मोठी अपेक्षा होती. कारण त्याचवर्षी आधी भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत पराभूत करत कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता.

England vs India
Viral Cricket Video: गांगुलीने २००२ मध्ये जे केलं, तेच पुन्हा लॉर्ड्समध्ये? भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा VIDEO तुफान व्हायरल; नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com