Viral Cricket Video: गांगुलीने २००२ मध्ये जे केलं, तेच पुन्हा लॉर्ड्समध्ये? भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा VIDEO तुफान व्हायरल; नेमकं काय घडलं?

Ganguly Lord’s celebration recreated by Indian players: लॉर्ड्सवर इंग्लंडला ११८ धावांनी हरवल्यानंतर भारतीय मिश्र दिव्यांग क्रिकेट संघाने केलेल्या सेलिब्रेशनने सौरव गांगुलीच्या २००२ मधील ऐतिहासिक जल्लोषाच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
India disability cricket team Lords viral celebration video

Indian mixed disability cricket team recreates Sourav Ganguly Lords celebration

esakal

Updated on: 

Ganguly Lord’s celebration recreated by Indian players: २००२ मधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने केलेला जल्लोष भारतीय क्रिकेट चाहते आजही विसरलेले नाहीत. त्यावेळी सौरव गांगुलीने इंग्लंडचा पराभव केल्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानाच्या बाल्कनीत आपला शर्ट काढून अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला होता. आता पुन्हा एकदा लॉर्ड्सच्या त्याच बाल्कनीत असाच जल्लोष पाहायला मिळाला आहे.

बुधवारी (१९ ऑगस्ट) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय मिश्र दिव्यांग क्रिकेट संघाने इंग्लंडवर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत भारतीय खेळाडूंनी केलेला जल्लोष पाहून अनेकांना गांगुलीच्या त्या जुन्या सेलिब्रेशनची आठवण झाली. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com