
Australia vs England: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी (२२ फेब्रुवारी) होत आहे. या सामन्यात इंग्लंडला शानदार सुरुवात मिळाली असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली आहे. सलामीवीर बेन डकेटने शतकी खेळी केली, त्याला जो रुटचीही चांगली साथ मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीची सुरुवातही चांगली केली होती. सलामीवीर फिल सॉल्टला दुसऱ्याच षटकात १० धावांवर बेन ड्वारशुईने बाद केले. त्याचा अफलातून झेल ऍलेक्स कॅरेने पकडला.