
England vs Australia: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत शनिवारी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानातील लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्याआधी परंपरेनुसार दोन्ही संघांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. पण त्यावेळी एक गोंधळ झाल्याचे दिसले.