
इंग्लंड संघाने भारताविरुद्ध हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी वर्चस्व निर्माण केल्याचे दिसत आहे. यामध्ये त्यांच्या सलामीवीरांचाही समावेश आहे. या सामन्यात शेवटचा दिवस निर्णायक असून दोन्ही संघांना विजयाची संधी आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, त्यावेळी इंग्लंडला ३५० धावांची गरज होती, तर भारताला १० विकेट्सची गरज होती. या दिवशी इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने शतक ठोकले आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव ३६४ धावांवर संपला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावातील ६ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी दुसऱ्या डावात ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यालक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ६ षटकात बिनबाद २१ धावा केल्या होत्या. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रावली आणि बेन डकेट नाबाद होते.