
भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यातील बाँडिंग गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांनी पाहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चुकीचा फटका मारून बाद झाल्यानंतर रिषभ पंतला गावसकरांनी समालोचन करताना 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड' म्हटलं होतं.
पण त्यानंतर याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर दोघांना एकत्र एकाच जाहिरातीतही चाहत्यांनी पाहिले. त्यामुळे गावसकरांच्या कमेंटवर रिषभ नाराज नसल्याचे स्पष्ट झाले होते.