
इंग्लंडचा भारत दौरा नुकताच संपला आहे. त्यांच्यासाठी हा दौरा फारसा चांगला ठरला नाही. आधी ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत इंग्लंडला ४-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला, तर वनडे मालिकेत त्यांना भारताने ३-० असा व्हाईटवॉश दिला.
याशिवाय त्यांच्या काही खेळाडूंना छोट्या दुखापतींचाही सामना करावा लागला, जी त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली. कारण या दौऱ्यानंतर इंग्लंडही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. अशात सर्व खेळाडू तंदुरुस्त असावेत अशीच अपेक्षा त्यांची असणार आहे.