
इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारताविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळायची आहे. मात्र त्यापूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरला पराभूत झाला होता. त्यानंतर कटला दुसरा सामना रविवारी खेळला जात आहे.
पण या सामन्यासाठी इंग्लंडला तीन बदल करावे लागले. यातील एक बदल दुखापतीमुळे करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक केलेल्या जेकॉब बेथल याला प्लेइंग इलेव्हनमधून दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे.