Ben Stokes : निवृत्तीचा व्हिडीओ वादात अडकला, ICC ने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला जाब विचारला; स्टोक्सच्या २ शब्दांनी वाद चिघळला...

Ben Stokes retirement video controversy: बेन स्टोक्सच्या निवृत्तीशी संबंधित एका व्हिडीओमुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमधील काही बाबी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Ben Stokes retirement video controversy

Ben Stokes retirement video controversy

esakal

Updated on

Ben Stokes two-word reaction viral: ट्रेंट ब्रिज कसोटी सुरू असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ( ECB) स्टोक्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो आपल्या कारकिर्दीला रामराम करताना दिसला. पण, आता त्याच व्हिडीओवरून नवा वाद उफाळून आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) इंग्लंड बोर्डाकडे स्पष्टिकरण मागवलं आहे. आयसीसीच्या मते ECB ने आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान खेळाडू आणि सामना अधिकारी यांच्या क्षेत्रांसाठी (PMOA) असलेल्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com