
भारतीय कसोटी संघाला जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात २० जूनपासून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी घडामोड घडली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून एकापोठापाठ एक निवृत्ती जाहीर केली.
रोहितने ७ मे रोजी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर किमान विराट इंग्लंड दौऱ्यावर जाईल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. विराटची इंग्लंडमध्ये यापूर्वी चांगली कामगिरीही झाली आहे. त्यामुळे अनेकांना विराटला आगामी इंग्लंड दौऱ्यातही पाहण्याची उत्सुकता होती. मात्र विराटने १२ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.