
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने नुकतीच गेल्या आठवड्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे विराट आता फक्त वनडे क्रिकेट भारताकडून खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, फिटनेस असतानाही विराटने कसोटीतून अचानक निवृत्ती घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.