Beth Mooney breaks Virat Kohli world record
esakal
Australia Women win T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये यजमान इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून सातव्यांदा ट्रॉफी उंचावली. यष्टिरक्षक-फलंदाज बेथ मूनी ( Beth Mooney ) हिने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना ४९ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली. तिने फोएबे लिचफिल्डसोबत दुसऱ्या विकेटसाठी १० चौकारांसह १०० धावांची भागीदारी केली आणि १५१ धावांचे लक्ष्य १७.१ षटकांत सहज पार केले. ऑस्ट्रेलियाने हा सामना ७ विकेट्सने जिंकला.