चार वर्षांनी त्याच मैदानावर परतणार भुवनेश्वर कुमार! जिथे टी-२० पदार्पणात घेतल्या होत्या ३ विकेट्स, तिथेच आता मालिकेचा निर्णायक सामना

BHUVNESHWAR KUMAR COMEBACK? IND VS WI 5TH T20: अर्शदीप सिंगच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारचा भारताच्या संघात समावेश झाला आहे. पाचव्या टी-२० मध्ये त्याला संधी मिळणार का?
BHUVNESHWAR KUMAR COMEBACK?

BHUVNESHWAR KUMAR COMEBACK?

esakal

Updated on: 

BHUVNESHWAR KUMAR COMEBACK? IND VS WI 5TH T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा टी-२० सामना शनिवारी (१७ ऑक्टोबर) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

या निर्णायक सामन्यापूर्वी भारताच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला आहे. अर्शदीप सिंगच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी भुवनेश्वरला संधी मिळाली आहे. तो उद्याच्या सामन्यात खेळल्यास जवळपास चार वर्षांनंतर भारतीय टी-२० संघात पुनरागमन करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com