
Big Bash League 2025 new rules for T20 cricket explained : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत ट्वेंटी-२० लीग आहे. या लीगचे जगभरातील अन्य लीग अनुकरण करत असतं. आयपीएलने इम्पॅक्ट प्लेअर हा नियम आणला आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पण, या नियमामुळे ट्वेंटी-२०लीग अधिक रोमांचक झाली. ट्वेंटी-२० क्रिकेट हे प्रयोगशील बनले आहे आणि आगामी काळात यात आणखी काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलचा इम्पॅक्ट प्लेअर हा नियम आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्येही दिसणार आहे, परंतु त्याला Designated batter असे नाव दिले गेले आहे. या शिवाय एका चेंडूंत दोन फलंदाजांना बाद करता येणार असल्याचा नियमही येणार आहे.