Shoaib Malik announces retirement from the Pakistan Super League
esakal
Shoaib Malik announces retirement from Pakistan Super League: दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मलिकने २० जानेवारी २०२६ रोजी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली. PSLच्या ११ व्या हंगामापूर्वी त्याने निवृत्तीचा निर्णय घेऊन, चाहत्यांना आश्चर्यचकित केले. ४४ वर्षीय शोएब १० वर्षांपासून पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतोय.
"PSL मध्ये खेळाडू म्हणून माझ्या १० वर्षांच्या काळात, मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाची आणि प्रत्येक मैत्रीची मी नेहमीच कदर करेन. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. पण, क्रिकेटच्या भल्यासाठी काम करण्याची माझी आवड आणि जिद्द नेहमीच राहील. धन्यवाद, PSL," असे तो म्हणाला.