IND vs NZ 1st Test: भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी धक्का... ज्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये खरी गरज, तोच मुकणार; नेमकं काय घडलं?

India vs NZ Test series team selection latest update: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.
Rishabh Pant ruled out of India A third unofficial Test

Rishabh Pant ruled out of India A third unofficial Test

Updated on: 

Rishabh Pant doubtful for first Test against New Zealand: भारत अ संघाला तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत रिषभ पंत याच्याशिवाय खेळावे लागणार आहे. ७ नोव्हेंबरपासून ही कसोटी सुरू होणार होती, परंतु आधीच दोन कसोटी सामन्यांना मुकलेल्या रिषभला आता तिसऱ्या सामन्यातही खेळता येणार नाही. इराणी कपमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाचे नेतृत्व करत असताना पंतला बरगडीला दुखापत झाली. अनधिकृत कसोटी मालिकेत त्याचा सहभाग तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून होता. १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीही पंतच्या सहभागाबद्दल शंका उपस्थित झाली आहे.

Loading content, please wait...