बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

Shakib Al Hasan reaction on Bangladesh T20 World Cup withdrawal: शकिब अल हसन पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आला आहे. बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाकिबने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत आल्यानंतर त्याने या विषयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय “मोठी चूक” असल्याचे म्हटले.
Shakib Al Hasan reacts strongly after Bangladesh’s withdrawal from the T20 World Cup 2026.

Shakib Al Hasan reacts strongly after Bangladesh’s withdrawal from the T20 World Cup 2026.

esakal

Updated on

Shakib Al Hasan in Mumbai reaction full story: भारत-श्रीलंका येथे झालेल्या २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशच्या अनुपस्थितीवर शकिब अल हसनने या निर्णयाला सरकारची “मोठी चूक” म्हटले आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार मुंबईत EU T20 Belgium 2026 लीगच्या जर्सी अनावरण सोहळ्यासाठी आला होता आणि त्याने म्हटले की, भारतात सामने खेळण्यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील वाद मिटला नाही. त्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली आणि त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींना आपल्या संघाला जागतिक स्पर्धेत पाहण्याच्या संधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com