

Bangladesh Boycotts T20 World Cup : बांगलादेश सरकारने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणार नसल्याचे अखेर जाहीर केले. बांगलादेशने मुस्ताफिजूर रहमानची इंडियन प्रीमिअर लीगमधून करण्यात आलेल्या हकालपट्टीचा राग असा काढला. भारतात बांगलादेशी खेळाडूंना सुरक्षेचा धोका असल्याचे सांगून त्यांनी सामने श्रीलंकेत हलवण्याचा हट्ट धरला होता. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांना केराची टोपली दाखवली. अखेर आज बांगलादेश सरकारने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आज खेळाडूंसोबत बैठक पार पाडली आणि भारतात न खेळण्याची भूमिका ठाम असल्याचे जाहीर केले. बांगलादेश सरकराने या स्पर्धेवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. पण, त्यांच्या मागणीचा आयसीसीने विचार केल्यास ते खेळण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.